शिक्षक सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न ....


        शनिवार दिनांक 21.01.2023 रोजी शिक्षक भवन लोअर परेल येथे  बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेचा हळदी - कुंकवाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. महापालिकेच्या विविध विभागातून अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद उपस्थित झाले होते. यानिमित्त सर्व उपस्थितांना शिक्षक सभेचे सरचिटणीस शरद सिंह, अध्यक्ष सर्जेराव चवरे, कोषाध्यक्ष जयप्रकाश सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना काळानंतर प्रथमच सर्व महिला कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे वेगळा आनंद दिसून येत होता. कार्यक्रम श्रीम आमुदा अन्नाराज यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला. कार्यक्रमाची पूर्वतयारी कार्यालयीन चिटणीस प्रकाश राऊत यांनी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यसमिती सदस्य श्रीम सुप्रिया आईर व आभार प्रदर्शन निशा मौर्या यांनी केला.







शिक्षक सभा कोड क्र. 19



HOME

Post a Comment

0 Comments